Friday, April 26, 2024
Homeजळगावदेशदूत वारीचे अभंग...

देशदूत वारीचे अभंग…

सासर-माहेर

सासर-माहेर :

- Advertisement -

“””””””””””””””””””

कष्टाचे, मोहाचे

संसार सासर.

दुःखाचे आगार,

आहे देवा.

भक्तीचे, मुक्तीचे

पंढरी माहेर.

सुखाचा वावर,

वारीमध्ये.

संसारी राहून,

करावा नेटका.

दावो न फाटका,

जगताला.

कामात शोधावा,

राम हर घडी.

जगण्यात खोडी,

काढू नये.

भना. म्हणे शोध,

समाधान येथे.

पांडूरंग जेथे,

विसावला.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

- Advertisment -

ताज्या बातम्या