देशदूत वारीचे अभंग...

नाही भेदाभेद : प्रा.बी.एन.चौधरी
देशदूत वारीचे अभंग...

नाही भेदाभेद

नाही भेदाभेद :

""""""""""""""""""""

नाही भेदाभेद,

पुरुष नि स्त्रिया.

बंधू-भाव माया,

वारीमध्ये.

नारी वारकरी,

जना, मुक्ताबाई.

सखू, बहिणाई,

संत झाल्या.

घेवून हातात,

वारीचा भगवा.

गाईला जोगावा,

वैराग्याच्या.

हरी नामा मध्ये,

घालविला शीण.

घट्ट केली वीण,

विठ्ठलाशी !

भना. म्हणे त्यांचा,

मोठ्ठा अधिकार.

रुख्मिणीचा वर,

सखा त्यांचा !

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com