किती त्याची रुपं
विठ्ठल बनला.
आरोग्याचा दूत
स्वच्छता शाबूत
ठेवण्याला.
अंगावर खाकी,
घालून राबला.
पोलिस वाटला,
पांडुरंग.
डाॅक्टर रुपात
वाचविले प्राण
ठेवून गहाण,
देवपण.
झाला सेवेकरी
विठोबा मास्तर
धावला सत्वर
मदतिला.
भना म्हणे तुझी
सांगू किती रुपं
शिणला तू खूप
भक्तांसाठी
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३