Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : जागेवर ३० रुपये भाव ठरला होता, आज दोन रुपये किलोनेही...

Video : जागेवर ३० रुपये भाव ठरला होता, आज दोन रुपये किलोनेही कुणी घेईना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओझे (Oze) येथील समाधान पठाडे (Samadhan Pathade) या शेतकऱ्याची (Farmer) अडीच एकर द्राक्षबाग (Grapes Farm) अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) जमीनदोस्त झाल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी पठाडे यांनी ही द्राक्षबाग लावली होती. गेल्या वर्षी करोनामुळे (Corona) द्राक्ष विकली गेली नाही. यंदा हाता तोंडाशी आलेल्या घास अवकाळीने हिरावून नेला.

- Advertisement -

आपल्या मुलाच्या शेतीचे नुकसान झाल्यानंतर पठाडे यांच्या आई हंबरडा फोडला. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी देशदूतची टीम ओझे गावात पोहोचली. द्राक्षांचा जागेवर ३० रुपये भाव ठरला होता. मात्र आता नुकसानीमुळे आज दोन रुपये किलोनेही द्राक्ष कुणी घेईना, अशी स्थिती झाली असल्याचे पठाडे यांनी सांगितले.

देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पठाडे कुटुंबीयांनी आपबिती सांगितली आहे. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या