Saturday, April 27, 2024
HomeनाशिकGround Report : जिल्ह्यात 'या' ठिकाणी आहे 'चिंचेचे गाव'; जाणून घ्या कुठे

Ground Report : जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी आहे ‘चिंचेचे गाव’; जाणून घ्या कुठे

नाशिक | टीम देशदूत | Nashik

निफाड जवळील कोठुरे हे गाव अनेक कारणांनी इतिहासात प्रसिद्ध आहे. या गावाची एक ओळख म्हणजे ‘चिंचेच गाव’ होय. या गावात आता सुमारे ५०० हून अधिक चिंचेची वृक्ष आहे. या वृक्षांचे संवर्धन माधवराव बर्वे करत आहेत…

- Advertisement -

याबाबत माधवराव बर्वे यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांनी कोठुरे गावात सुमारे एक हजार चिंचेची वृक्ष लावली होती. मात्र सद्यस्थितीत ते वृक्ष आता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मी संकल्प केला की, गावात पुन्हा एक हजार चिंचेच्या वृक्षांची लागवड करायची. हळूहळू मी एक-एक वृक्षाची लागवड करत गेलो. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मी वृक्ष लागवडीस सुरुवात केली. आता ५०० हून अधिक वृक्ष लावली असून एक हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केलेला आहे.

‘अशी’ बनवली रोपं

बर्वे यांनी आजूबाजूच्या परिसरात फिरून चांगल्या चिंचा शोधल्या. या चिंचाच्या चिंचूक्यांपासून त्यांनी स्वतः रोपे तयार केली. त्यानंतर त्यांनी कोठुरे गावातील नदीकाठी, शेतात, शाळेच्या सभोवताली चिंचेची लागवड केली आहे.

ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे हा उद्देश

हजार वृक्ष लावली तर चिंचेतून सुमारे वीस लाखांचे उत्पन्न मिळू शकेल. या उत्पन्नाचा फायदा ग्रामपंचायतीला होईल, असा उद्देश माधवराव यांचा आहे.

चिंचेच्या वृक्षाची वैशिष्ट्ये

चिंच हा दीर्घायुषी वृक्ष आहे. चिंच हा सदाहरित वृक्ष असल्याने रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावला जातो. शंभर वर्षांहून अधिक काळ हे वर्ष जगतात. चिंच ही अनेक प्रकारे शरीराला गुणकारी आहे. चिंचेप्रमाणेच चिंचेची पानं सुद्धा अत्यंत उपयोगी आणि शरीराला लाभदायक आहेत. चिंचेच्या पानांमध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन सी आणि टार्टारीक आम्ल असते. तसेच यात फायबर, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम ही पोषणद्रव्ये आढळतात. चिंचेच्या पानातील टार्टारीक आम्ल आणि व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या