Video पाहा, पालकमंत्री गुलाबरावांनी खेळली फुगडी

jalgaon-digital
1 Min Read

मुक्ताईनगर – प्रतिनिधी Muktainagar

श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून भीमातीरावरील विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीचे प्रस्थान आज झाले. महाराष्ट्र शासनाने मानाच्या दहा पालख्यांना आषाढी वारीसाठी मान्यता दिल्यानुसार यातील प्रथम निघणाऱ्या श्री संत मुक्ताईबाई पालखीचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पूजन झाले व ‘कोरोना जाऊदे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे’अशी प्रार्थना पालकमंत्र्यांनी मुक्ताईन चरणी केली. तसेच मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीती पालखीचे प्रस्थान झाले. या सोहळ्या दरम्यान पालकमंत्र ना.गुलाबराव पाटील यांचेसह आ.चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा फुगळी खेळण्याचा आनंद लुटला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *