Video निरागस बालकाचा जीव घेणाऱ्या कार मालकाला अटक करा!

धरणे आंदोलनासाठी डायमंड ग्रुप आला एकत्र

जळगाव - jalgaon

जळगाव शहरात इनोव्हाची रेस लावण्याच्या नादात मेहरूण तलाव (Merun Lake) परिसरात एका निरागस बालकाचा जीव घेणार्‍या कारच्या मालकाला अटक करावी अशी मागणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector's Office) समोर निदर्शने करण्यात आली.

विक्रांतची घटना सर्वांना चटका लावून जाणारी आहे, म्हणून या बालकाचा जीव घेणाऱ्यांना अटक व्हावी यासाठी जळगावातील डायमंड व्हाटसअप ग्रुपतर्फे (Diamond Whatsapp Group) ही निदर्शन करण्यात येत आहे. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, माजी महापौर विष्णू भंगाळे, सरकारी वकील केतन ढाके, आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यासोबत जिल्हाधिकार्‍यांना (Collector) निवेदन देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com