Video : 'असे' आहे ममदापूर येथील हरीण संवर्धन केंद्र; पाहा देशदूतचा खास Ground Report

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola taluka) ममदापूर (Mamdapur) येथे संवर्धन केंद्र विकसित करण्यात आले असून याठिकाणी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर हरीण संवर्धन केंद्र (Deer Conservation Centre) उभारण्यात आले आहे...

Video : 'असे' आहे ममदापूर येथील हरीण संवर्धन केंद्र; पाहा देशदूतचा खास Ground Report
मालेगावी बहरली अ‍ॅपल बोरांची शेती; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत (Forest Department) या हरीण संवर्धन केंद्राचे व्यवस्थापन केले जात असून येथे पाच हजारांपेक्षा अधिक हरीण मुक्तपणे संचार करतांना दिसतात. हरणांसाठी या केंद्रात वेगवेगळ्या प्रकारच्या गवताची (Grass) लागवड करण्यात आली आहे, जेणेकरून ही हरणं आसपासच्या शेतीत जाऊ नये आणि शेतीचे नुकसान होऊ नये. त्यामुळे हे संवर्धन क्षेत्र याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनाला प्रसन्न करणारे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Video : 'असे' आहे ममदापूर येथील हरीण संवर्धन केंद्र; पाहा देशदूतचा खास Ground Report
Video : मालेगावातील शेवगा पोहोचतोय परदेशात; पाहा देशदूतचा खास Ground Report

दरम्यान, यासोबतच परिसरात छानसे तळे असल्याने याठिकाणी कोल्हा, लांडगा, ससा यासारख्या वेगवेगळ्या प्रकारचे पशु-पक्षी पर्यटकांना भुरळ घालत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर शालेय सहली आणि पर्यटकांची (Tourists) वर्दळ बघायला मिळते.

Video : 'असे' आहे ममदापूर येथील हरीण संवर्धन केंद्र; पाहा देशदूतचा खास Ground Report
Ground Report : मालेगावात 'अशी' बहरली अंजिराची शेती, पाहा व्हिडीओ

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com