Video : जास्त पावसाळी प्रदेशात शेतीला उपयुक्त ठरणारा 'डांगी बैल'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

डांगी बैल हा महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात एक डांगी जातीचा बैल आहे. डांगी जातीचा बैल हा प्रामुख्याने ज्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते त्याच परिसरात हा बैल आढळतो.

जास्त पावसाच्या प्रदेशात यांची कार्यक्षमता टिकून राहते. यांच्या कातडीवर तेलकट स्त्राव पसरलेला असल्याने पाण्यापासून अपाय होत नाही.

काटक आणि ताकदवान असल्यामुळे या जातीचे बैल डोंगरात जाऊन चरतात. आपल्या धिप्पाड शरीरामुळे बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त असतो. या बैलांचे अकोले, इगतपुरी तालुक्यात प्रदर्शनदेखील भरवले जाते. पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com