Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमनोधैर्यातून करोना मुक्तीकडे वाटचाल

मनोधैर्यातून करोना मुक्तीकडे वाटचाल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा शासकीय रूग्णालयातील करोना कक्षात सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य कक्षाच्या कामगिरीच्या परिणामी करोना रूग्णांमधील भीती नाहीशी होऊन रूग्ण करोनामुक्त होण्यास मोठी मदत झाली आहे. आतापर्यंत या कक्षातून 6 हजार पेक्षा अधिक करोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू होताच पहिल्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाने करोनाची धास्ती घेतली होती. एकदा करोना झाला म्हणजे आपण मरणार अशीच भावना रूग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची होती. याबाबत सकारात्मक मानसिक आधार देण्यासाठी, करोना बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे मानसोपचार समुपदेशन व टेली काउंसेलिंग सुविधा सर्वाधिक उपयुक्त ठरली आहे. आतापर्यंत सहा हजार पेक्षा अधिक जणांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

करोनाच्या भितीदायक परिस्थितीतून जाताना सर्वांच्या मनोवस्थाही बदलत गेल्या. गेलेला रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न, केवळ घरात थांबून राहाणे भाग पडल्याने तसेच करोना संसर्गाची भीती यामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला.लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासून सिव्हील हॉस्पिटल मधील मानसोपचार विभागाने शेल्टरसह विविध ठिकाणी समुपदेशनाची सेवा देण्याचे काम केले आहे.

आताही थेट सिव्हील हॉस्पिटलच्या कोविड इमारतीमध्ये जाऊन रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम समुपदेशकांद्वारे सुरू आहे. आपल्याला करोना संसर्ग झालाय ही भीतीच रुग्णांना अधिक अस्वस्थ करीत आहे. त्यांच्या मनात नेमके काय चाललेय हे समजून घेणे आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन पेरण्याचे काम मानसोपचर तज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती चव्हाण, गोपाल घोडके, हुकूमचंद अगोने, गौरव शितोळे, सायली बोन्द्रे, अरविंद पाईकराव, शीतल अहिरराव, वैशाली पाटील या समुपदेशकांमार्फत सुरू आहे.

रूग्णाच्या कुटुंबातील व्मक्ती बाधित झाल्माने नातलगांचेही मनोधैर्य खच्ची होत आहे. त्मामुळे रुग्णांपेक्षा त्मांच्मा नातलगांचेच अधिक समुपदेशन करावे लागत असल्माची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर मांनी दिली आहे. रुग्ण आणि त्मांच्मा नातेवाईकांनी काम काळजी घ्मामला हवी माबाबतचे समुपदेशन करण्माचे काम चार समुपदेशक करीत आहेत. पीपीई किटसह सुरक्षेबाबतची सर्व खबरदारी घेऊन ते रुग्णांशी संवाद साधत आहेत.

कक्ष ठरला वरदान

जिल्हा रूग्णालयाच्यावतीने करोना बाधीत रूग्ण तसेच नातेवाईकांना मानसिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मनोधैर्य कक्ष वरदान ठरला आहे. यातून रूग्ण सकारात्मक विचार करून उपचारांना त्यांचे शरिरही चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले. यासह केेलेल्या जनजागृतीच्या परिणामी सर्व नागरिकांमधून आता करोनाची भिती दूर झाली असून करोना पॉझिटिव्हचाही आकडा घटत असल्याचे चांगले चित्र आहे.

डॉ. निलेश जेजुरकर, मानसोपचार तज्ञ जिल्हा रूग्णालय

- Advertisment -

ताज्या बातम्या