Video : शेडनेटमध्ये रंगीत सिमला मिरचीची लागवड

नाशिक | Nashik

पारंपारिक शेती (Traditional Farming) ही न परवडणारी झाली असून या शेतीस खर्च अधिक असल्याने उत्पन्नाची (income) हमी मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थतीवर मात करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील (Malegaon taluka) दाभाडी (Dabhadi) येथील उपक्रमशील युवा शेतकरी महेंद्र निकम यांनी त्यांच्या शेतीत शेड-नेट उभारत लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीचा (Capsicum) भरघोस उत्पन्नाचा प्रयोग यशस्वी केला आहे...

शहरी भागात सिमला मिरचीला मोठी मागणी असल्यामुळे आणि बाजारभाव (Market Price) चांगला मिळत असल्याने या पिकाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मोबदला मिळत असल्याचे निकम यांनी त्यांच्या यशस्वी प्रयोगातून दाखवून दिले आहे. तसेच पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती (Farming organically) करण्यावर निकम यांनी भर दिला असून त्यामधून खर्च कमी आणि जमिनीची उत्पादकता वाढविण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे.

तसेच शेतकरी (Farmer) हा सर्वात प्रयोगशील समूह असल्यामुळे असा नवा प्रयोग शेतकऱ्याला शेतीच्या पारंपारिक तोट्याच्या जोखडातून बाहेर काढणारा ठरू शकतो असा विश्वास युवा शेतकरी महेंद्र निकम यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय कल्पकता, प्रयोगशिलता आणि संयम या सर्वांच्या संयोगाने शेतीला नवा आयाम देता येऊ शकतो हे निकम यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com