नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची शिर्डीत गर्दी

नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची शिर्डीत गर्दी

शिर्डी । Shirdi

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी देश परदेशातून लाखो भाविक शिर्डीत हजेरी लावण्यासाठी येतात. मात्र यंदा यावर्षी करोनामुळे बंधनं असली तरीही, गर्दी वाढताना दिसत आहे.

यावर्षी शिर्डीत येण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय करण्यात आली आहे. मात्र, १ जानेवारीपर्यंतचे बुकिंग पूर्ण क्षमतेने झाल्याने हजारो भाविकांनी थेट शिर्डीत हजेरी लावली आहे. प्रत्यक्ष दर्शन नाही मिळाले तरी चालेल, पण खूप महिन्यांनी शिर्डीत पाय ठेवून यायचे, या अपेक्षेनेही अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे.

2020 ला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली असून साईबाबा संस्थान ने सुद्धा जय्यत तयारी केली आहे. देशभरातील भाविक दरवर्षी शिर्डीला हजेरी लावतात मात्र या वर्षी नियमांचं बंधन असल्यानं मोठी गर्दी करता येणार नाही. मात्र भाविकांची संख्या मर्यादित असली तरी साई मंदिर परिसर आकर्षक फुलांनी  सजविण्यात आले असून मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दिल्ली येथील साईभक्ताने स्वतःच्या खर्चातून ही सजावट केली असून आज रात्रभर मंदिर साई दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्यानं हजारो साईभक्तांना समाधी मंदिराच दर्शन घेणे सुकर होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com