Video : नवीन नाशकात पावतीसाठी नागरिकांची गर्दी

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
Video : नवीन नाशकात पावतीसाठी नागरिकांची गर्दी

नाशिक । Nashik

पवन नगर भाजी बाजारच्या बाहेर पाच रुपये शुल्क भरण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. दोन दिवसापासुन नाशिक महापालिका तसेच नाशिक पोलीस पोलिसांच्या माध्यमातुन नाशकातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये पावती उपक्रम सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन नाशकातील पावन नगर परिसरात पाच रुपयांची पावती फाडण्यासाठी गर्दी दिसून आली.

त्यामुळे ज्या गोष्टीसाठी पावतीचा प्रयोग करण्यात त्याच ठिकाणी सोशल डिस्टन्ससिंग फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

(व्हिडिओ प्रतिनिधी : निशिकांत पाटील )

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com