Friday, April 26, 2024
Homeनगरनामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांची संगमनेर तहसील कार्यालयात तोबा गर्दी

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांची संगमनेर तहसील कार्यालयात तोबा गर्दी

संगमनेर । प्रतिनिधी । Sangamner

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

तांत्रिक कारणामुळे उमदेवारी दाखल करण्यास उशीर होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पारंपारिक पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली असून अडीच तासांनी वेळ वाढवून दिला आहे. यामुळे यंदाच्या ग्रामपंचायात निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. आज निवडणूक आयोगाने इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्रापासून वंचित राहू नये म्हणून ऑनलाइन सह ऑफलाइन पद्धतीने नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे संगमनेर तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या