Saturday, April 27, 2024
HomeनगरVideo : करोना संकट, वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी मातेची यात्रा रद्द

Video : करोना संकट, वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी मातेची यात्रा रद्द

सलाबतपूर | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी मातेचा २ मे रोजी होणारा यात्रा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यामुळे यावर्षी ही राज्यातील भाविक स्वयंभू असलेल्या नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला मुकणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून करोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षीही हा यात्रा महोत्सव रद्द करण्यांत आला होता. यावर्षी पुन्हा उन्हाळा सुरू होताच नव्याने करोना रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्यातच शासनाने पंधरा दिचसाचा लाॅकडाऊन सुरू केला आहे. १ एप्रिल पासून भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर बंद आहे. केवळ मंदिरात नित्याची पुजा करण्यात येत आहे. तर मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेऊन शासनाला मंदिर समितीकडून सहकार्य केले जात असून करोनाचा वाढता कहर पाहता यावर्षीचा यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समिती अध्यक्ष एकनाथ शिरसाठ यांनी सांगितले.

यावेळी सरपंच विनोद ढोकणे, समिती अध्यक्ष एकनाथ शिरसाठ, सचिव कडुपाटील गोरे, उपाध्यक्ष लक्षाधिश दाणे, श्रीरंग हारदे देवराव शिरसाठ, भगवान जगधने, सुरेश शिरसाठ उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या