पैस खांबाच्या दर्शनाला मुकले लाखो वारकरी

कामिका एकादशीमुळे प्रशासनाने नेवासा बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहरातील नागरिकांनी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला

कामिका एकादशी निमित्त नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबाचे दर्शनाला दरवर्षी अनेक लाखो भाविक येत असतात. यावर्षी करोनामूळे भाविक दर्शनाला मूकले.

गुरूवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात तसेच नेवासा श्रीरामपूर रोड, नगर पंचायत परिसर, उषा टॉकीज, तुकाराम महाराज मंदिर, व संत ज्ञानेश्वर मंदिराच्या मुख्य रोडवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता. या वेळी कामिका एकादशीमुळे प्रशासनाने नेवासा बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहरातील नागरिकांनी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

कमिका एकादशी निमित्त पहाटे चार वाजता मच्छिंद्र भवार, सौ. शांताबाई भवार, भैय्या साहेब, कावरे शामल कावरे, ह भ प देशमुख महाराज, मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात दुग्ध अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

मोहन गायकवाड यांचा व्हिडिओ रिपोर्ट....

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com