Friday, April 26, 2024
HomeUncategorizedVideo : नाशिकरोड रेल्वे स्थानकात सरकते जिने उभारण्याचे काम वेगात

Video : नाशिकरोड रेल्वे स्थानकात सरकते जिने उभारण्याचे काम वेगात

नाशिक रोड | Nashik

येथील रेल्वे स्थानक एक महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकातून रोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेता दोन वर्षांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून प्लॅटफ्रॉम क्रमांक एक वर प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी सरकते जिने उभारण्यात आले. या सरकत्या जिन्याचा हजारो प्रवाशांना फायदा होत आहे. याच धर्तीवर आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर सुद्धा सरकते जिने उभारण्यात येणार असून त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. लवकरच या सरकत्या जिन्यांचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.

- Advertisement -

(व्हिडीओ स्टोरी : दिगंबर शहाणे)

- Advertisment -

ताज्या बातम्या