Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याViral Video : कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला, मदत करायची सोडून बॉक्स पळवण्यासाठी लोकांची...

Viral Video : कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला, मदत करायची सोडून बॉक्स पळवण्यासाठी लोकांची झुंबड

कोल्हापूर | Kolhapur

आज सकाळी कोल्हापुरमधील पुईखडी येथे कोल्ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. यावेळी लोकांनी ट्रकचालकास मदत करण्याऐवजी कोल्ड्रिंक्स पळवून नेले आहेत. अनेकांनी दुचाकीवरून कोल्ड्रिंक्स बॉक्स पळवल्याची माहिती मिळत आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास गोव्याकडे कोल्ड्रिंक्स घेऊन जाणारा एक कंटेनर पुईखडी येथे उलटला. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात असणाऱ्या पिराचीवाडी परिसरात हा अपघात झाला आहे. यानंतर कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या उचलून नेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

ही बातमी आजूबाजूच्या गावात पसरताच मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूकदेखील विस्कळीत झाली होती. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यामध्ये कोल्डड्रिंक्सचा कंटेनर रस्त्याकडेला पलटी झाल्याचे दिसून येत आहे. तर कोल्डड्रिंक्सच्या बॉटल्स पळवून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या