Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : द्राक्षांवर हवामानाचे संकट अजुन ४८ तास

व्हिडीओ स्टोरी : द्राक्षांवर हवामानाचे संकट अजुन ४८ तास

नाशिक | Nashik

अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे राज्यात बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने तुरळक भागात अवकाळी पाऊस पडत आहे.

- Advertisement -

याच पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासुन अचानक किमान तापमानात वाढ होऊन रिमझिम स्वरुपात अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्ष बागाईतदार शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान अशाप्रकारे ढगाळ वातावरणाचे संकट पुढचे दोन दिवस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

ढगाळ वातावरणाचा फटका मराठवाडा व विदर्भाला बसल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात पुढचे ४८ तास हेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. यात उत्तर महाराष्ट्रात अवकाळी व गारपीटीची शक्यता र्वतविण्यात आली आहे.

बदललेल्या वातावरणामुळे द्राक्षांसह फळ बागाईतदार शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील तयार होण्याच्या उंबरठ्यावर असलेली, फुलोर्‍यात असलेली आणि पहिल्या टप्प्यात असलेल्या अशा तीन टप्प्यातील द्राक्षांना अवकाळी व ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे.

यामुळे औषधांचा खर्च वाढणार असुन गुणवत्तेला फटका बसण्याची शक्यता असल्यने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या