Video : ...जेव्हा छगन भुजबळ वाजवतात नाशिक ढोल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे गुढीपाडवा (Gudi Padwa) उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) नात ईश्वरी भुजबळ (Ishwari Bhujbal) यांच्या हस्ते स्त्रीपुरुष समानतेची गुढी उभारण्यात आली. यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिक ढोलवर (Nashik Dhol) ठेका धरला. तसेच त्यांनी नाशिक ढोलचे वादनही केले...

गेली दोन वर्षे करोना महामारीत गेले. अतिशय दुःखद घटना. अनेक आप्तेष्ठ करोनामध्ये सोडून गेले. हळूहळू कालांतराने सर्व गोष्टी सुरलाईत होऊ लागल्या. यावर्षीची गुढी स्त्रीपुरुष समानतेसाठी नात ईश्वरीच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. एकमेकांचे काटे न काढता आनंदाची उधळण करत हा सण आपण साजरा करूया. सर्व राजकीय गोष्टी बाजूला ठेऊन आज फक्त सण साजरा करण्याचा मानस आहे, असे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

आज इतक्या दिवसानंतर सण साजरा होतोय याचा आनंद वाटत आहे. त्यात आजोबांच्या समवेत हा आनंद द्विगुणित झाला आहे, अशी प्रतिक्रिया ईश्वरी भुजबळ यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com