Video : चांदवडच्या विकासाला हवंय तरी काय?

नाशिक | टीम देशदूत

नाशिकपासून (Nashik) ७० किलोमीटरवर चांदवड (Chandwad) हे गाव असून साधारणता २५ ते ३० हजारांच्या आसपास येथील लोकसंख्या (Population) आहे. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असून गावात रेणुका माता, चंद्रेश्वर महादेव,आणि शनी महाराजांचे मंदिर आहे. त्यामुळे जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी याठिकाणी येत असतात...

चांदवडमधील नागरिकांचा (Citizens) उदरनिर्वाह शेतीसह (Agriculture) हॉटेल आणि इतर छोट्या-मोठ्या व्यवसायांवर अवलंबून आहे. गावातील काही नागरिक छोटे-मोठे व्यवसाय करून आपले जीवन जगतात.मात्र, इतरांना दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे याठिकाणी बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येथे भविष्यात एखादी औद्योगिक वसाहत (Industrial Estate) तयार झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

तसेच चांदवडमध्ये पाण्याची (Water) समस्या देखील जटील बनली असून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी जरी मुबलक प्रमाणात मिळत असले तरी शेतीसाठी दुसरे पाण्याचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी (Farm) पाणी मिळेल याची देखील व्यवस्था करणे गरजेचे आहे. यासोबतच आरोग्य, शिक्षण या मुलभूत सुविधांपासून देखील चांदवडकर काही प्रमाणात दुर्लक्षित झाले आहेत.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com