Sunday, May 5, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकमध्ये चंदुकाका सराफ यांचे भव्य दालन; साजश्रृंगारासाठी अभिनव पर्याय

Video : नाशिकमध्ये चंदुकाका सराफ यांचे भव्य दालन; साजश्रृंगारासाठी अभिनव पर्याय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नैतिक मुल्यांच्या आधारावर चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि. (Chandukaka Saraf & Sons Pvt. Ltd.) सुवर्णपेढी आपला पारदर्शी व्यवसायाचा वारसा जपत आली आहे त्याला यावर्षी १९५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या वाटचालीमध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे तो असंख्य आणि अमूल्य ग्राहकांचा…

- Advertisement -

शुद्ध सोने, नावीन्यपूर्ण डिझाईन्ससाठी लोकप्रिय असलेल्या चंदूकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि. या लोकप्रिय सुवर्णपेढीच्या दालनांचा महाराष्ट्रभर विस्तार झाला आहे. नुकतीच त्यांनी नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नर येथे १८ वि शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू केली आहे.

आता नाशिककरांना साजश्रृंगारासाठी उत्तमोत्तम आणि अभिनव पर्याय उपलब्ध होणार आहे. चंदूकाका सराफचे संचालक सिद्धार्थ शहा (Siddharth Shah) यांनी नुकतीच देशदूत कार्यालयात सदिच्छा भेट दिली व त्यांच्या सराफी पेढीविषयी माहिती सांगितली.

वैशिष्ट्यपूर्ण व नवनवीन दागिन्यांच्या विविध डिझाईन्स बनविणे यावर चंदूकाका सराफ यांचा अधिक भर असतो. ग्राहक हित आणि दालनात खरेदी केल्यानंतर ग्राहकांना समाधान मिळेल यावर जास्तीत जास्त लक्ष दिले जाते. सध्या कल्पतरू, गोल्ड ट्री आणि इएमआय स्वरूपात दागिने खरेदी करण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोन्याच्या भावात दररोज बदलाव येत असतात. त्यामुळे वर्षभर असलेल्या सोन्याच्या भावाचा दर हा कल्पतरू योजने अंतर्गत सरासरी पद्धतीने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जातो. गोल्ड ट्री योजनेत १० महिने दर महिन्याला विशिष्ट रक्कम भरल्यानंतर दागिने खरेदीवर एक हप्ता हा कंपनीकडून भरण्यात येतो. इएमआय (EMI) योजनेत ग्राहकांना कोणताही दागिना आपल्या बजेट प्रमाणे हप्त्यांवर खरेदी करता येऊ शकतो त्यासाठी काही अटी शर्थी लागू आहेत. १५ जून पर्यंत याठिकाणी कर्णफुल महोत्सव सध्या सुरू असल्याची माहिती शहा यांनी दिली.

चंदुकाका सराफची खास वैशिष्ट्ये

१०० टक्के पारदर्शक व्यवहाराची हमी, विनाघट जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने, कोणतेही व्यवहारांसाठी ०% कार्ड चार्जेस, हिरॉईनच्या दागिन्यांवर कायमस्वरूपी मोफत सर्विस, मोडीची रक्कम थेट ग्राहकाच्या बँक अकाउंट मध्ये त्वरित जमा, सोन्या-चांदीची शुद्धता तपासण्यासाठी कॅरोमीटर, चांदीच्या शुद्धतेनुसार दर, सर्टिफाइड हिरे व राशी रत्ने, मोफत ज्योतिषी सल्ला उपलब्ध, चंदूकाका सराफ वेबसाईटवरून ऑनलाईन दागिने खरेदी करण्याची सोय.

लग्नसोहळ्यासाठी लागणारे सर्व दागिने एकाच छताखाली उपलब्ध असून वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशन ही एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे नाशिककरांनी चंदुकाका सराफ दालनास एकदा आवर्जून भेट देऊन सुरू असलेल्या विविध योजना तसेच वैशिष्ट्यपूर्ण दागिने खरेदीचा आणंद घ्यावा.

सिद्धार्थ शहा, संचालक, चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि.

- Advertisment -

ताज्या बातम्या