Video : सीबीएस ते मेहेर सिंगल वाहतूक पूर्ववत; अग्निशमन विभागाने वाचवली महागडी कार

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाशिकमधील वर्दळीच्या स्मार्टरोडवर (Smart road nashik) एका कारमधून सीएनजी लिकेज (fiat car cng leakage) होत असल्याची घटना घडली. या घटनेमुळे सीबीएसपासून मेहेर सिग्नलपर्यंत मोठी वाहतूक कोंडी (cbs to meher signal traffic jam) झाली होती….

सीबीएस ते मेहेर सिग्नल वाहतूक बंद; कारमधील सीएनजी लिकेजमुळे झाली कोंडी

शहर पोलीस (City police) आणि अग्निशमन विभागाने (fire department) घटनेची गांभीर्यता लक्षात घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बंदोबस्त तैनात करत वाहतूक सीबीएसपासून इतरत्र वळवली. तर वाहतूक कोंडीतून वाट काढत अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

कारचालकाकडून चावी घेत गाडीची डिक्की उघडण्यात आली. यानंतर मोठया प्रमाणावर लिकेज होत असलेला सीएनजी बंद करण्यासाठी कसरत केली. गसच्या टाकीचा वोल्व्ह बंद करण्यात यानंतर अग्निशमन विभागाला यश आले.

यानंतर वाहन चालकास वाहन इतरत्र दुरुस्तीसाठी नेण्यास सांगण्यात आले. गुजरात पासिंग असलेले हे वाहन वाचविल्याने वाहनातील नागरिकांनी नाशिक पोलीस आणि अग्निशमन विभागाचे आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *