नाशकात मृत्यूचं तांडव! अपघातानंतर बसने घेतला पेट, दुर्घटनेचा भयावह व्हिडीओ आला समोर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज पहाटे नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे....

या बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी होते. चितांमणी ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एम एच २९ ए डब्ल्यू ३१०० यवतमाळ ते मुंबई जात होती. नाशिकमध्ये मिरची हॉटेल जवळ एका आयशर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. त्यानंतर अचानक बसला आग लागली.

आता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com