Video/Photo : अमोल मिटकरींविरोधात नाशकात ब्राह्मण समाज आक्रमक; प्रचंड घोषणाबाजी

Video/Photo : अमोल मिटकरींविरोधात नाशकात ब्राह्मण समाज आक्रमक; प्रचंड घोषणाबाजी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द आणि आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्याविरोधात आज नाशकात प्रचंड निदर्शने करण्यात आली. राजकीय नेते समाजाची अवहेलना करणारी वक्तव्ये करीत असतात. याच्या निषेधार्थ सर्व शाखिय ब्राह्मण संस्था नाशिककडून आज आंदोलन छेडण्यात आले....

यावेळी मोठ्या संख्येने महिलांसह समाजातील पुरुषांनी आंदोलनाला गर्दी केली होती. भगवे झेंडे, भगवी वेशभूषा परिधान करत मिटकरी यांच्या विरोधात समाजबांधवांनी घोषणाबाजी केली.

शहरातील बि डी भालेकर मैदानापासून या आंदोलनाला भर उन्हात दुपारी दोनच्या सुमारास सुरुवात झाली. शालीमार एमजीरोड मार्गे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Related Stories

No stories found.