Video : पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी नाशकात महामृत्युंजय मंत्र जप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर पंजाबमध्ये (Panjab) प्राणघातक हल्याचा काँग्रेसचा (Congress) कट होता, मात्र ईश्वर कृपेने आणि देशाच्या १३५ कोटी जनतेचे आशीर्वादाने पंतप्रधान यातून सुखरुप बाहेर पडले, असे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी सांगितले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्रच्या वतीने आज रामकुंड (Ramkund) येथे 'महामृत्युंजय मंत्रजप' करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून भारतमातेची अखंड सेवा व्हावी यासाठी आज बाणेश्वर भगवानांना रुद्राभिषेक करण्यात आला, साधू महंत आणि पुरोहितांच्या उपस्थितीत 'महामृत्युंजय मंत्रजप' करण्यात आला. काँग्रेसपक्ष राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही विचारांचा होत चालला आहे. काँग्रेसमुक्त भारत व्हावा, पंतप्रधानांचे हात अधिक बळकट व्हावे यासाठीच आज ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, साधू आणि पुरोहित उपस्थित होते. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com