Video : भाजपचे नाशकात आंदोलन; मालेगाव, अमरावती, नांदेड येथील घटनेचा निषेध

Video : भाजपचे नाशकात आंदोलन; मालेगाव, अमरावती, नांदेड येथील घटनेचा निषेध

नाशिक | प्रतिनिधी Nashik

त्रिपुरामध्ये (Tripura) कोणतीही अनुचित घटना घडली नसताना मशिदीची नासधूस केल्याची क्लिप व्हायरल (Clip viral) करून महाराष्ट्रात मालेगाव (Malegaon), अमरावती (Amravati) व नांदेड (nanded) येथे नुकत्यात दंगली उसळल्या होत्या. मोठ्या जमावाने या दंगलीत सहभाग घेत दुकाने, कार्यालये तसेचे वाहनांचे मोठे नुकसान त्यांनी केले. या घटनेचा भाजपकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत या घटनेचा निषेध करण्यात आला.... (BJP agitation malegaon, amravati and nanded issue)

यावेळी विविध मागण्या भाजपकडून करण्यात आल्या. (various demands by bjp). यामध्ये त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकारची चौकशी सर्वोच्च नायाल्याच्या निर्वृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे.

ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या सामार्ध्कांना अटक केली पाहिजे. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी

भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांच्या वरील पूर्वग्रहदुषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे मागे घ्यावेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com