Friday, April 26, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : भिवतास धबधबा दुर्लक्षितच

व्हिडीओ स्टोरी : भिवतास धबधबा दुर्लक्षितच

दिंडोरी / जानोरी Dindori Janori

सुरगाणा तालुक्यातील केळवन येथील भिवतास धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटनाच्या प्रतिक्षेत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात राज्यातूनही पर्यटकांची येथे रेलचेल असते. परंतु त्यांच्या सोयीसुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे एकही काम झालेले नाही हे विशेष…

- Advertisement -

या भिवतास धबधब्याचा विकास व्हावा अशी मागणी वारंवार करून देखीलही ती मागणी पूर्ण होत नाही. या धबधब्यावर अनेक वेळा आमदार-खासदार , प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी देऊनही धबधब्याच्या विकासाला चालना मात्र मिळाले नाही.

येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास कामडी , जलदुत नितीन गांगुर्डे तसेच पोलीस पाटील विजय चौधरी यांनी या भिवतास धबधब्याच्या विकासाची मागणी केली असून याला लवकरात लवकर चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे‌.

याच मागणीतून नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. बी. गुदगे यांनी भिवतास धबधब्यावर भेट देऊन पाहणी केली.

नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्यवनसंरक्षक अधिकारी यांच्याशी जलदुत नितीन गांगुर्डे, पोलीस पाटील विजय चौधरी यांनी विकासात्मक दृष्टीने लवकरात लवकर कामे व्हावी याबाबत मागणी केली.

वनविभागाने भिवतास धबधब्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्या मुळे स्थानिकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून स्थानिकांनी वन विभागाचे आभार मानले आहे व लवकरात लवकर विकासात्मक कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावेळी भारतीय प्रशासन सेवेचे आय.एफ.एस. अधिकारी रेड्डी , वनपरिक्षेत्र अधिकारी गवारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या