भेंडा कोविड सेंटरमध्ये हसत खेळत होतेय करोनावर मात

रुग्णांना खेळासह योगाचे ही धडे
भेंडा कोविड सेंटरमध्ये हसत खेळत होतेय करोनावर मात

भेंडा lवार्ताहरl Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास मध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटर मधील करोनाबाधित रुग्णांची शारिरीक शक्ती व मानसिक धैर्य वाढवण्यासाठी योग, ध्यान व प्राणायाम सत्र घेतले जात आहेत.

रुग्णांना मोकळी हवा मिळावी,योगा-खेळांच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण मिळावी, मन मोकळं करण्यासाठी समुपदेशन सत्र घेतले जातात.यासाठी कक्ष सुरू करण्यात आला आहे.रुग्णांना खेळण्यासाठी साहित्य देण्यात आले.क्रिकेट,बॅटमिंटन या सारखे खेळ खेळविले जातात. भक्तनिवास प्रांगणात सहवासित आनंदाने हसत-खेळत हे रुग्ण बरे होत आहेत.


चांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रजनीकांत पुंड, भेंडा येथील नागेबाबा वेलनेस क्लबच्या फिटनेस कोच प्रा.सविता नवले, साईनाथ गोंडे, सुनील दगडे, गणेश महाराज चौधरी हे यासाठी महत्वाचे योगदान देत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com