Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

राहुरी तालुक्यातील भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारने कृषी विधेयक कायदे केल्याने सदर कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. त्याच अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज भारत बंद हाक देण्यात आली आहे. या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील तांदुळवाडी येथे देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकाळपासून पूर्णपणे बंद ठेवला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेंद्र आढाव यांनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या