Video : विसर्ग वाढला; भांडीबाजार रिकामा करण्यास प्रारंभ; दुकानदारांची दमछाक

Video : विसर्ग वाढला; भांडीबाजार रिकामा करण्यास प्रारंभ;  दुकानदारांची दमछाक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या प्रसिद्ध भांडी बाजारात (Bhandi Bazar, Nashik) आज दुपारनंतर पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी दुकानातून सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे....

प्रशासनाकडून पाणी वाढण्याआधीच अलर्ट दिल्यामुळे एकमेकांच्या मदतीने दुकानातून सामान हलविण्यास सुरुवात केली आहे. गोदावरीच्या पात्रात (Godavari River) असलेल्या काही व्यावसायिकांनी चाके असलेल्या दुकानांना सकाळपासूनच हलविण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, सराफाची दुकाने, भांड्यांच्या दुकानांतून वस्तू एकत्र करून हलविण्यात येत आहेत. पाणी वाढणार असल्यामुळे व्यावसायिकांना धडकी भरली आहे.

Related Stories

No stories found.