Video : ...यामुळे भद्रकाली मंदिराला कळस नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवरात्र सुरू होताच नाशिककरांचे पाय देवीच्या दर्शनासाठी भद्रकाली मंदिराकडे वळतात. भारतात देवीची ५१ शक्तिपीठे आहे त्यापैकी भद्रकाली हे एक शक्तिपीठ आहे. पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते. १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते.

...म्हणून मंदिराला कळस नाही

भद्रकाली देवीची मूर्ती भंजकांच्या भीतीने मंदिरातील मूर्ती सुरक्षितरीत्या सध्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. तेव्हापासूनच या मूर्ती आताच्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकाली मंदिराच्या जागी पूर्वी मठ होता. त्यामुळे या मंदिराला कळस नाही.

Video : ...यामुळे भद्रकाली मंदिराला कळस नाही
Visual Story : नवरात्रात नाशिकच्या 'या' पाच देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर

Related Stories

No stories found.