Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : एक रूपयाच्या नाण्यावर रेखाटले डॉ.बाबासाहेबांचे चित्र

Video : एक रूपयाच्या नाण्यावर रेखाटले डॉ.बाबासाहेबांचे चित्र

संदीप तीर्थपुरीकर

औरंगाबाद – aurangabad

- Advertisement -

औरंगाबाद शहरातील कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूल (Shri Shankarsingh Naik High School) येथील कलाशिक्षक राजेश निंबेकर (Art teacher Rajesh Nimbeker) यांनी १.५ त्रिज्या असलेल्या एक रुपयाच्या नाण्यावर अवघ्या ३५ मिनीट आणि १५ सेकंदात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटले. जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (International Book of World Records) मध्ये नोंद झाली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या वेळेस खूप जास्त मार्गदर्शक ठरलेत.

वर्तमानात आणि भविष्यात देखील अर्थकारणात ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’मधील मूल्य हे मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक रुपयाच्या नाण्यावर राजेश निंबेकर यांनी आंबेडकरांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटन त्यांना आगळ्या- वेगळ्या कलात्मक पद्धतीने अभिवादन केले आहे.

यापूर्वी देखील राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी काढून विश्वविक्रम केला होता. त्याची देखील ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. या प्रयोगामुळे आता राजेश निंबेकर यांच्या नावावर दोन विश्व विक्रमाची नोंद झाली आहे.

राजेश निंबेकर यांनी यापूर्वी देखील अनेक कलांच्या माध्यमातून फलक लेखन, रांगोळी, चित्र, पोट्रेट, नाट्य, नृत्य, काव्यलेखन, गायन या कलेच्या माध्यमातून महामानवांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या