व्हिडिओ स्टोरी

श्रावण विशेष : सह्याद्रीतील अमृतेश्वर मंदिर

सह्याद्रीच्या पर्वत रांगातील, निसर्ग रम्य परिसरात असणारे हे मंदिर भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण आहे.

Sarvmat Digital

प्रवरा नदीचे उगमस्थान असणार्‍या रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडी नावाचे आदिवासी खेडे आहे. या रतनवाडीत अप्रतिम स्थापत्य शैली चा नमुना असणारे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

अकोले तालुक्यातील रतनवाडी येथील अमृतेश्वराचे मंदिर हेमांडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहाला मागील बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह आहे. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.

सह्याद्रीच्या पर्वत रांगातील, निसर्ग रम्य परिसरात असणारे हे मंदिर भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यातही विशेषतः श्रावणी सोमवार निमित्ताने भाविक दर्शनासाठी येत असतात. परिसरातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. भंडारदरा ,घाटघर येथे येणारे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. एव्हढ्या दुर्गम जागी असलेले अप्रतिम मंदिर पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात.

Deshdoot
www.deshdoot.com