शिक्षकाने माळरानावर फुलविली आंब्याची वाडी

नाशिक | मोहन कानकाटे

शिक्षकाची (Teacher) नोकरी सोडून हरसूल परिसरातील (Harsul Area) निरगुडे शिवारात (Niragude Shivar) माळरानावर तीन एकर क्षेत्रामध्ये २७०० आंब्याच्या झाडांची (Mango Trees) लागवड करुन अंबादास भोये (Ambadas Bhoye) यांनी आंब्याची वाडी फुलवुन माळरानाला वेगळे वैभव प्राप्त करुन दिले आहे...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) निरगुडे (Nirgude) येथील भोये हे उच्चशिक्षित असूनही त्यांनी आंबा शेतीची कास धरली आहे. शिक्षक म्हणून सुरुवातीला त्यांनी नोकरी केली. परंतु त्यात फार काळ ते रमले नाही. शिक्षकाची चांगली नोकरी सोडून त्यांनी वडिलांचा परंपरागत शेतीचा (Agriculture)व्यवसाय पुढे सुरू ठेवला. भोये यांनी सुरुवातीला आंबा लागवडीपूर्वी संपूर्ण शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर १६ एप्रिल २०१४ रोजी आंब्यांची लागवड केली.

भांडवला अभावी तीन टप्प्यात त्यांना आंब्याच्या झाडांची लागवड करावी लागली. सुरुवातीला दीड एकर क्षेत्रावर, नंतर अर्धा व पुन्हा १ एकरवर १२ बाय ४ च्या अंतरावर आंब्याची झाडे लावली. यासाठी आप्तस्वकीय व मित्रांनी त्यांना भांडवलाची मदत केली. कष्टाचे चिज झाल्यानंतर भोये यांनी प्रामाणिकपणे तीन वर्षातच घेतलेले पैसे परत केले. त्यानंतर तीन वर्षांनी तब्बल ५ टन उत्पादन (Product) काढले.

त्याचबरोबर आंब्याची लागवड केल्यानंतर पाऊस (Rain) उघडल्यावर झाडांची निगा राखावी लागते. यासाठी देखील भोये यांनी पद्धतशीर नियोजन केले आहे. पावसाळ्यानंतर सुरुवातीला ते जमीन (Land) नांगरतात. त्यानंतर किडीच्या फांद्या काढतात. याशिवाय जमीन जपण्यासाठी झाडाच्या फांद्या छाटून त्याचा पालापाचोळा आंब्याच्या झाडाच्या बुडाजवळ ठेवतात. यानंतर तो पालापाचोळा सडतो व त्यापासून गांडूळ खत तयार होऊन शेतीला सुपीक खत मिळते.यामुळे पाण्याचे प्रमाण वाढते. हे सर्व समजून घेऊन भोये यांनी आंब्याला पोषक वातावरण तयार केले आहे.

याशिवाय भोये यांनी एक किलोमीटरवरून पाईपलाईनद्वारे पाणी आणून ड्रिपच्या माध्यमातून आंब्याच्या झाडांना दिले आहे. त्यामुळे झाडांना (Trees) जितकी पाण्याची गरज असते तितकेच मिळते. तसेच या झाडांना हिवाळ्यात (winter) सरासरी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणी दिले तरी चालते. परंतु उन्हाळ्यात दोन दिवसाआड पाणी द्यावे लागते. ते सर्व वेळापत्रक त्यांनी तंतोतंत पाळले.त्यामुळे शिक्षकाच्या पगारापेक्षा उत्पन्न तर वाढलेच परंतु आत्मीक समाधानही मिळाले. त्याचबरोबर गावातील वातावरण शुध्द झाले.

तसेच आंब्याच्या झाडांची लागवड करत असतांनाच भोये यांनी २०१० पासून आंब्याच्या कोईंपासून कोयकलम बनवण्याची कला अवगत केली. यावर्षी त्यांनी ७६ हजार कोयकलम बनवले असून हे कलम येथील भागातच दिली आहेत.त्यामुळे निरगुडे गाव आता आंब्यासाठी प्रसिध्द होऊ लागले आहे.

दरम्यान, वसंत ऋतुत कोकीळेच्या कुऊ कुऊ मंजुळ स्वराने निरगुडे शिवार प्रसन्न भासत असून भविष्यात येथे नैसर्गिक आंब्याचा गोडवा चोखण्यासाठी पर्यटक (Tourists) गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. तसेच भोये हे पेशाने शिक्षक जरी असले तरी हाडाचे शेतकरी (Farmer) असून माळरानावर सुंदर आंब्याची वाडी फुलवून त्यांनी गावाला वेगळा नावलौकिक प्राप्त करुन दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com