Video उद्यापासून सर्व मंदिरे उघडी करणार - आ.महाजन

Video उद्यापासून सर्व मंदिरे उघडी करणार - आ.महाजन

फक्त महाराष्ट्रातच बंद आहेत मंदिरे

जामनेर - प्रतिनिधी Jamner

इतर राज्यांमध्ये सर्व ठिकाणी मंदिरे उघडण्यात आली असून फक्त महाराष्ट्रातच मंदिरे बंद आहेत. राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी आज जामनेर मध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचे नेतृत्वाखाली भाजपातर्फे भाजी मंडी हनुमान मंदिर मध्ये घंटानाद करण्यात आला.

आमदार कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात चालत जाऊन हनुमान मंदिराचे कुलूप तोडून आमदार महाजन यांनी कार्यकर्त्यांसह आत प्रवेश केला.

या आंदोलनात शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे ,माजी प.स.सभापती छगन झाल्टे, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, नगरसेवक आतीश झाल्टे, दीपक तायडे, नाना वाणी, पुखराज डांगी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com