व्हिडिओ स्टोरी
Video : डोंगराईचा हिरवा शालु व वाहणारे झुळूक पाणी
अकोले तालुक्यातील पावसाळी सौंदर्य पाहा
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अकोले तालुक्यात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, धबधबे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे डोंगंराईने हिरवा शालु परिधान केला आहे.
पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी व अकोले तालुक्यातील सौंदर्य पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक गर्दी करू लागले आहे. तसेच कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला, तर निसर्ग सौंदर्य देखील हळूहळू खुलू लागले आहे. या पावसाच्या पाण्याने डोंगर दर्यातील झरे वाहते झाले आहे.
पावसाने जोर पकडल्याने डोंगर दर्यांमधून वाहणारे धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढेनाल्यांना पूर आला असून धरणात विसावर आहे. त्यामुळे धरणाचे खाली गेलेले पोट आता फुगू लागले आहे.