व्हिडीओ स्टोरी : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई

व्हिडीओ स्टोरी : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौकाचौकात बसून टवाळखोरी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेखानागर, शिवाजी चौक, रानाप्रताप चौक, दत्त चौक, विजय नगर, संभाजी स्टेडियम परिसर, उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक आदी ठिकाणी चौकाचौकात बसून टवाळखोरी, तसेच दहशत माजविनाऱ्या तरुणांवर अंबड पोलीस ठाण्याच्यावतीने कारवाई करण्यात आली.

यावेळी पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत टवाळखोरांचा चांगलाच समाचार घेतला. महिलांची छेडछाड करणाऱ्या तसेच उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना चपराक बसावी म्हणून खुद्द महिला पोलिसांकडूनच टवाळखोरांना दांडुक्याने प्रसाद देण्यात आला.

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई केली जात असून ही कारवाई सुरूच राहणार असे अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com