पिंप्री सैय्यद गावाची 'ही' प्रथा तुम्हाला माहीत आहे का?, पाहा व्हिडिओ
नाशिक | Nashik
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विवाहाच्या (Marriage) वेगवेगळ्या प्रथा, परंपरा प्रचलित आहेत. काही ठिकाणी धुमधडाक्यात तर काही ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केले जाते. याला कारणेही तशीच आहेत. कधी मुलीच्या घरची तर कधी मुलाच्या घरची परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे अवाढव्य खर्च (Expenses) टाळून मोठ्या थाटामाटात विवाह न करता अगदी साध्या पद्धतीने केला जातो...
असाच एक मोठा आदर्श समाजापुढे नाशिक तालुक्यातील पिंप्री सैय्यद गावाने (Pimpri Sayyad Village) घालून दिला आहे. ज्यावेळेस या गावातील शेतकऱ्यांना (Farmers) शेतीतून मिळणारे उत्पन्न चांगले होते. त्यावेळी येथील लोक लग्नावर मोठा खर्च करत होते. पंरतु, ज्यावेळेस लोक जमीनी (Land) विकून लग्न करायला लागले तेव्हा येथील ग्रामपंचायतीने एक ठराव करून आवाढव्य खर्चावर मर्यादा आणल्या.
या गावाने २००६ पासून लग्नामध्ये बांधले जाणारे फेटे, टॉवेल टोपी, शाल, यावर प्रतिबंध घालून अवाढव्य खर्च टाळला. तसेच ही अवाढव्य खर्चाची रक्कम ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) एकत्रित जमा करून त्यापासून गावातील विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे पिंप्री सैय्यद गावाने आवाढव्य खर्चावर आणलेल्या मर्यादा प्रत्येक गावाने आणल्यास समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण होईल.