Video : एका वृक्षावर शेतकऱ्याने केली २२ कलम, पेठ तालुक्यातील 'ही' फळबाग एकदा पाहाच...

नाशिक | Nashik

पेठ तालुक्यात (Peth Taluka)गावंधा पाडा (Gawandha pada) हे आदिवासी वस्ती (Tribal settlement) असलेले गाव आहे. गावामधील प्रमुख व्यवसाय हा शेती (Agriculture)असून येथील शेतकरी राजू इम्पाळ (Raju Imphal) यांनी एका झाडावर तब्बल २२ कलम केली आहेत...

इम्पाळ यांनी रायवळीच्या झाडावर (Mango Tree of Raiwali) आंब्याचे वेगवेगळे २२ ते २३ कलम फुलविले आहेत. यामध्ये राजापुरी, कोल्हापुरी, रत्ना, आम्रपाली, दसरी, यासारख्या विविध आंब्याचा समावेश आहे. रायवळीच्या बुडामध्ये चांगली ताकत असल्याने या झाडावर कलम लावल्याचे इम्पाळ सांगतात.

याशिवाय इम्पाळ यांनी लिंबू, पेरू, चिकू, जांभूळ, नारळ, फणस, या फळ झाडांसोबतच (Fruit Tree) ९ ते १० प्रकारची आंब्याची झाडे लावली आहेत. या सर्व फळ झाडांची लागवड करत असतांना आपल्या जमीनीमधील (Land) विषमुक्त फळ वेगवेगळ्या महिन्यांमध्ये खाण्यास मिळावे हा त्यामागचा हेतू असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com