Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : पंधरा दिवसांच्या बछडयाला मिळाली आईची माया

Video : पंधरा दिवसांच्या बछडयाला मिळाली आईची माया

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मोहाडी (Mohadi) येथे एका शेतात पंधरा दिवसांचे बिबट्याचे (Leopard) पिल्लू आणि मादी यांची भेट घालून घडवून आणण्यास वनविभाग (Forest Department) आणि ईको एको फ़ाउंडेशनला (Eco-Echo Foundation) यश आले आहे. त्यामुळे १५ दिवसांच्या बछडयाला आईची माया मिळाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात उमराळे परिमंडळात मोहाडी येथील अण्णासाहेब जाधव (Annasaheb Jadhav) यांचे उसाचे शेतात ऊस तोड सुरू असताना सकाळी 8 वाजता बिबट्याचे (Leopard) पंधरा दिवसाचे पिल्लू ऊसतोड कामगारांना मिळून आले.

शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागास (Forest Department) कळविले व त्यानंतर वनविभाग आणि ईको एको फ़ाउंडेशन (Eco-Echo Foundation) यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. बिबट मादी व पिल्लाची भेट घडविण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टींची तयारी करण्यात आली.

पिलू सापडलेल्या उसाच्या शेतात लाईव्ह कॅमेरा (Camera) लावण्यात आला. काही वेळाने मादी बिबट व पिल्लाची भेट घडवून आली. ही कार्यवाही पूर्व भागचे उपवनसंरक्षक उमेश वावरे (Umesh Wavre), सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी, वनपाल अशोक काळे, वनरक्षक योगिता खिरकाडे, वनसेवक यांच्यासह ईको एको फ़ाउंडेशनचे वैभव भोगले (Vaibhav Bhogale), सागर पाटील, आदित्य सामेळ यांनी यशस्वीरित्या घडवून आणली.

- Advertisment -

ताज्या बातम्या