VIDEO : सेलेनाने पुरस्कार सोहळ्यात किडनी देणाऱ्या मैत्रिणीचे मानले आभार

0

अमेरिकन गायिका सेलेना गोमेजने एका पुरस्कार सोहळ्यात किडनी देणाऱ्या मैत्रिणीचे आभार मानले आहेत.

‘बिलबोर्ड्स 2017 वुमन ऑफ द इयर’ हा पुरस्कार स्वीकारताना सेलेनाने फ्रॅन्सिआ रेसा या मैत्रिणीचे आभार मानताना तिचे अश्रू अनावर झाले.

‘फ्रॅन्सिआमुळेच मी आज हा पुरस्कार स्वीकारु शकतेय. तिनेच माझा जीव वाचवला आहे. मी खरंच खूप नशीबवान आहे’, असे ती म्हणाली.

पुरस्कार स्वीकारते वेळी सुरुवातीलाच सेलेनाने आपल्या मैत्रिणीचे आभार मानत खरंतर हा पुरस्कार फ्रॅन्सिआला मिळायला हवा होता, असे स्पष्ट केले. ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये मी सर्वांचीच ऋणी आहे’, असे म्हणत सेलेनाने तिच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांविषयी सर्वांनाच सांगितले.

LEAVE A REPLY

*