VIDEO : शुटींग दरम्यान ‘आर्ची’ पडली

0
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या नुकतेच एका मराठी सिनेमाची घोषणा झाली.
रिंकूचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बहुदा हा व्हिडीओ नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाचा असावा, यामध्ये एका शॉट्साठी रिंकू सज्ज होत आहे. हा सीन बहुदा एखाद्या गाण्याचा असावा असं त्या व्हिडीओतील म्युझिकवरुन वाटेल. मात्र दिग्दर्शकाने ऍक्शन म्हणताच आर्चीनं उडी मारली. मात्र जिथं शुटिंग सुरु होती तो भाग ओला असल्याने तिथं रिंकू पाय घसरुन जोरात पडली. रिंकू खाली कोसळताच सेटवर एकच धावपळ उडाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कोणत्या सिनेमाचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

*