VIDEO : पोर्तुगाल : सर्फिंग करताना 36 वर्षीय पुरुषाचे पाठीचे हाड मोडले!

0

पोर्तुगालमध्ये एका 36 वर्षीय पुरुषाचा वेव्ह सर्फिंग करताना अपघात झाला .

या अपघातात त्याचे पाठीचे हाड मोडले आहे. अन्ड्रयू कॉटन याचा वेव्ह सर्फिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मात्र, वेव्ह सर्फिंग करताना 50 फूट इतकी मोठी लाट उसळली, ज्यात कॉटन दूरवर फेकला गेला.

या अपघातात पाठीला मार बसल्याने त्याच्या पाठीचे हाड मोडले. कॉटन याला पोर्तुगालमधील रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या मोठ्या लाटेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यानं थेट समुद्रात उडी घेतली. त्यानंतर तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आले.

LEAVE A REPLY

*