VIDEO : Photogallery : अहमदनगर : विजयोत्सव ढोलताशांचा 2017 : ढोल-ताशा महासंघाची स्थापना

0

अहमदनगर : गेल्या चार वर्षापासून नगर शहरात व उपनगरात 8 ढोलपथके कार्यरत झाली असून गणेशोत्सवाच्या दरम्यान या ढोलपथकांमुळे डिजेचा आवाज बंद झाला.

हे सर्व ढोलपथक, सर्व वादक एकजुट राहावे म्हणून विजयादशमीच्या मुहूर्तावर ढोलताशा महसंघाची स्थापना करण्यात आली.

सुरुवातीला सर्व पथकांच्या वाद्यांचे (ढोल,ताशा,ध्वज, झांज) वाद्यपुजन करण्यात आले. सर्व पथकातील जवळपास 301 ढोल, 81 ताशे, 51 झांज आणि 11 ध्वजधार्‍यांनी तालबध्द वादन करत आपल्या महाकाय वादनाने सवेडीतील प्रोफेसर चौक परिसर दणाणून सोडला.

या उपक्रमात शहरातील रुद्रनाद, रुद्रवंश, कपिलेश्वर, हिंदवी शौर्य, तालयोगी, निर्विघ्नं पद्म्नादम् ह्या पथकांनी सहभाग घेतला.   

यावेळी कार्यक्रमाला प्रसिद्ध शिल्पकार शुभंकर कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.

नगर शहरात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येते असल्याने परिसरातील नागरिकांमध्येही याबाबत उत्सुकता होती. सुमारे सव्वा तास वादन सुरु रहिल्याने एकत्रितरीत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ढोलवादनाचा करयक्रम पाहणे ही नगरवसीयांच्या दृष्टीने पर्वनी ठरली.

प्रोफेसर चौकात यावेळी मोठी गर्दी जमल्याने रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

सर्व फोटो हे विठ्ठल कुसळकर ह्यांनी काढले आहेत.

 

LEAVE A REPLY

*