Type to search

टेक्नोदूत

व्हिडिओ गेम्सचा आजार

Share

व्हिडिओ गेम्सचे व्यसन लवकरच अधिकृतपणे आजार असल्याचे घोषित करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) या मुद्द्यावर लवकरच मतदान घेतले जाऊ शकते. व्हिडीओ गेम्सच्या व्यसनामुळे किशोरवयीन मुले आणि युवावर्ग मानसिक समस्यांचा सामना करू लागला आहे.

एमआरआय स्कॅनिंग मध्ये स्पष्ट झालेल्या माहितीनुसार व्हिडीओ गेम्सच्या व्यसनामुळे युवावर्ग सध्या तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्यांच्या विळख्यात सापडू लागला आहे. व्हिडीओ गेम्स हे मादक पदार्थ आणि मद्यपानासारखेच व्यसन आहे. डब्ल्यूएचओने गेल्या वर्षी 11 व्या इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिज या कार्यक्रमादरम्यान व्हिडीओ गेमच्या व्यसनाला आजारपणाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता.

हे व्यसन असलेले लोक आपल्या दैनंदिन कामकाजापेक्षा जास्त महत्त्व या गेमला देत असतील आणि त्याचा त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असेल तर त्याला गेमिंग डिसऑर्डर मानले जाऊ शकते. मात्र, व्हिडीओ गेम्सच्या व्यसनाला आजार मानण्याच्या निर्णयावर बिगर लाभकारी इंटरनॅशनल गेम डेव्हलपर्स असोसिएशनने टीका केली आहे.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जर तुम्ही तुमची दैनंदिन कामे उरकून वेळ काढून व्हिडीओ गेम खेळत असाल तर त्या लोकांसाठी हा आजार ठरू शकत नाही. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, शाळा सुटल्यानंतर मुले घरी आल्यानंतर केवळ मोबाईल गेम्सवर आपला वेळ घालवत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!