Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकची थंडी बोचरी पण हवी हवीशी

Video : नाशिकची थंडी बोचरी पण हवी हवीशी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकची थंडी ही थोडी बोचरी तरी पण हवीहवीशी वाटणारी आणि त्यासाठी म्हणून खाण्यामध्ये,पेहरावामध्ये आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कसरतीमध्ये विशेष करुन लक्ष दिले गेले पाहिजे असे मत ‘देशदूत’ संवाद कट्ट्यात मान्यवरांनी व्यक्त केले.
‘देशदूत’तर्फे आयोजित संवाद कट्टा उपक्रमात ‘हुडहुडी भरवणारी नाशिकची थंडी’ या विषयावर झालेल्या चर्चेत फिटनेस तज्ज्ञ पूनम आचार्य, वैद्य विभव येवलेकर, फॅशन तज्ज्ञ श्रुती भुतडा, ‘देशदूत’च्या कार्येकारी संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

हिवाळा हा शरीराला ताकद देणारा ऋतू असतो. थंडीच्या दिवसात शरीराची, वनस्पतींची एकुणच निसर्गाची ताकद वाढलेली असते. मात्र या थंडीला सामावून घेताना आपल्याला आपल्या आहारात,विहारात,पेहरावात बदल करणे महत्त्वाचे असते.थंडीतला गारवा शरीराच्या आतपर्यंत भिनत असतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, हात-पाय उलणे ही लक्षणे जाणवायला लागतात. त्यातच थंडीमुळे वाढणारी भूक यामुळे आपल्या शरीराची पौष्टिक आहाराची मागणी या दिवसात बदलत जाते आणि त्यानुसार आपल्या आहारात प्रत्येकाने बदल करायला हवा असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच व्यायामाचे वेध लागतात. बरेच जण व्यायामासाठी या दिवसांची वाट पाहत असतात.थंडीच्या दिवसात शरीराची ताकद वाढल्याने व्यायामासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये आपल्याला लवकर थकवादेखील जाणवत नाही. गार हवेचा वेगळा आनंद असतो.वातावरणात वेगळ्या प्रकारचा टवटवीतपणा असतो. आपली पचनक्रिया देखील या दिवसात चांगली असल्याने अंडी,लाडू यासारखे पदार्थ सहज पचतात. त्यामुळे आपल्याला जे काही आवडते ते ते आपण या दिवसात खाऊ शकतो. या दिवसात लाडू, गव्हाचे पदार्थ, दूधाचे पदार्थ-पनीर तसेच गोड पदार्थ जास्त पचत असल्याने ते खावे. थंडीत आइस्क्रीम खाण्याचा नवीन ट्रेंण्ड सध्या सुरू आहे.अगदीच कधी-मध्ये खायला हरकत नाही; मात्र अतिप्रमाणात खाणे अयोग्य आहे.

त्याचबरोबर थंडीमुळे-गारव्यामुळे संधिवात व श्वसनाचे आजार बळवण्याची शक्यता अधिक असल्याने वृद्धांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञानी सांगितले.या दिवसात वेगवेगळ्या वयोगटाला वेगवेगळ्या कपड्यांची गरज असते.त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणाईने टे्रण्डी कपडे घालावे, मात्र स्वत:चा थंडीपासून बचाव करायला हवा.त्यासाठी गरम कपडे घालायला हवे.थर्मल वेअर,लोकरीपासून बनवलेल्या उबदार कपड्यांचा अधिक वापर करायला हवा. लहान मुलांसाठी बाजारात डोके, कान झाकण्यासाठी विविध प्रकारच्या टोप्या, कानपट्ट्या सहज उपलब्ध होतात, त्या वापरायला हव्या. महिलांनीही जाड कपडे वापरायला हरकत नाही.व्यायाम करताना तरुणांनी,वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी. व्यायामाला जाताना वूलनचे कपडे घालू नये असे तज्ज्ञांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या