VIDEO : ‘मानसून शूटआऊट’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांना नक्की काय पाहायच त्यावर ट्रेलरचा शेवट अवलंबून

0

‘मानसून शूटआऊट’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

भारतातील हा पहिला ट्रेलर आहे ज्यात प्रेक्षकांना नक्की काय पाहायचे आहे त्यावर ट्रेलरचा शेवट अवलंबून असणार आहे.

पहिल्यापासूनच ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो आणि ट्रेलरच्या शेवटी पोलिस अधिकारी विजय शर्मा याला नक्की काय कराव हा विचार करताना दाखवलं आहे. त्याचवेळी प्रेक्षकांना दोन पर्याय दिले जातात.

त्यांना नक्की काय पाहायचं आहे अशी विचारणा यात केली आहे. प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार ट्रेलरचा पुढील भाग निवडता येतो. जर नवाजला मारुन टाकण्याचा पर्याय निवडला, तर वेगळा ट्रेलर पाहायला मिळतो आणि त्याला सोडून देण्याचा पर्याय निवडल्यास तसा ट्रेलर पाहायला मिळतो.

एकाचवेळी दोन वेगवेगळी कथानक ट्रेलरमधून पाहायला मिळतात.

LEAVE A REPLY

*