VIDEO : ‘लैला मै लैला’ गाण्यावर थिरकला क्रिस गेल!

0

क्रिस गेलने नुकताच त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडिओमध्ये तो ‘लैला मै लैला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये गेलच्या मागे हिरव्या रंगाचा पडदा दिसतो, ज्यावरुन हे स्पष्ट होतं की तो एका जाहिरातीचे चित्रीकरण करत आहे.

गेलने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले की, जो अशाप्रकारे डान्स करेल त्याला तो ५ हजार डॉलर्स देईल. हे अनोखं चॅलेंज पुरुष आणि महिला या दोघांसाठीही आहे. गेलने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, ते त्यांचे व्हिडिओ #ChrisGayleDanceChallenge या हॅशटॅगने अपलोड करु शकतात. त्यातले सर्वोत्तम पाच व्हिडिओ तो आपल्या पेजवर शेअर करणार. या पाच व्हिडिओंमधून सर्वोत्तम कोण हे मात्र प्रेक्षकच निवडतील. २४ जुलैला क्रिस स्वतः विजेत्याचे नाव घोषित करणार आहे.

LEAVE A REPLY

*