Video : राणेनगर परिसरात उड्डाणपुलावर ट्रक पेटली

0

नवीन नाशिक (दिलीप कोठावदे) : रानेनागर येथे उड्डाणपुलावर आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक एका ट्रकने पेट घेतला. ट्रकच्या
वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वायरिंग पेटली असल्याचे लक्षात येताच चालक व क्लिनरने प्रसंगावधान राखून उड्या घेतल्या. त्यामुळे या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ४४६७ हे वाहन नाशिकहून मुंबईकडे जात होते. या अपघातामुळे वाहतुकीचा  खोळंबा झाला होता, एका बाजूने वाहतूक मात्र सुरु ठेवण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

LEAVE A REPLY

*